गणेश विसर्जन पर्यावरणपूरक आणि सोयीचेही

0
161
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

गणेश मूर्ती आणि निर्माल्याचे पर्यावरणपूरक विसर्जन ही चळवळ वीस वर्षापासून कोल्हापुरात सुरु आहे. ही एक सकारात्मक आणि अनुकरणीय चळवळ आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळणे, पर्यावरणाची हानी रोखणे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. ही चळवळ निसर्गप्रेमी नागरिकांनी कोल्हापुरात रुजविली. गेल्या पाच वर्षापासून कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेने या चळवळीला बळ दिले. न्यायालयानेही गणेश मूर्ती व निर्माल्यामुळे जल प्रदूषण होऊ नये याची स्थानिक स्वराज्य संस्थांनी दक्षता घेण्याचे आदेश काढले. आता मूर्ती व निर्माल्य दान आणि पर्यावरणपूरक विसर्जन  हा उपक्रम गणेशभक्तांना सोयीचा वाटत आहे.

या चळवळीची वैशिष्ट्ये: 

  • शासन व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग: स्थानिक प्रशासन, महापालिका, पर्यावरणप्रेमी संस्था आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही चळवळ यशस्वी झाली आहे.
  • प्रतीकात्मक विसर्जन: मूर्तीचे सरोवरात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन न करता, विशेषत: तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन केले जाते. यामुळे जलप्रदूषण टाळले जाते.
  • निर्माल्य संकलन व पुनर्वापर: फुलं, हार, पत्री यांचे संकलन करून त्याचा सेंद्रिय खतासाठी वापर केला जातो, काही ठिकाणी याचे कंपोस्टिंगही केले जाते.
  • जनजागृती मोहीम: शाळा, महाविद्यालयं, मंडळं आणि सामान्य नागरिक यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर्स, रॅली, कार्यशाळा, वर्कशॉप्स घेतले जातात.
  • मिट्टीच्या मूर्तींचा वापर: प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्तींचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

मूर्ती,निर्माल्य पर्यावरण विसर्जनाचे फायदे :  नद्यांचे आणि तलावांचे प्रदूषण टळते, जिवंत, जलजीवांचे रक्षण होते, पर्यावरणप्रेमी संस्कृती वाढीस लागते, पुढच्या पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळते

गणेश मूर्ती व निर्माल्य पर्यावरणपूरक विसर्जन या उपक्रमामुळे जसे जल प्रदूषण टाळले जाते तसेच हा उपक्रम नागरिकाना सोयीचाही वाटतो. कारण घराजवळच मूर्ती, निर्माल्य विसर्जनाची सोय होते. यासाठी दूर जावे लागत नाही. गणेश मूर्तीचे व निर्माल्याचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जित करण्याची रीत होती. लोकसंख्येच्या हिशोबात गणेश मूर्ती प्रतिष्ठापनाही वाढल्या, मूर्ती बनविण्याचे साहित्य बदलले. यांमुळे जलप्रदूषणाचा धोकाही निर्माण झाला. नैसर्गिक पाणवठेही नागरी वस्तीपासून दूर आहेत. निर्माल्य  कुंड प्रत्येक प्रभागात एक किंवा आवशक्यतेनुसार अनेक ठेवली  जातात. म्हणजे घरापासून जास्तीत जास्त सातशे मीटरवर विसर्जनाची सोय होते. 
गणेशोत्सव हा आनंदाचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. आपण त्याचा आनंद घेत असतानाच निसर्गालाही जपायला हवं. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन ही आपल्या भावी पिढीसाठी एक सुंदर देणगी आहे. गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे मूर्ती, निर्माल्य जलस्त्रोतात विसर्जित केल्यामुळे होणारे जल प्रदूषण टाळता येते. 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here