पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
वारणा खोऱ्यातील ग्रामीण भागातील गोर- गरीबांच्या वैद्यकिय सुविधेसाठी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल रुग्णालयाचे मोठे योगदान लाभले आहे. या रुग्णालयात मोफत वैद्यकिय, शस्त्रक्रिया आणि डायलेसिस सुविधा सुरु झाल्या असून लवकरच शासनाच्या उपचार मोफत योजनाही सूरू होतील. या रुग्णसेवेचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन वारणा समुहाचे प्रमुख आमदार डाॅ विनय कोरे यांनी केले. ते पारगांव येथे मोफत अत्याधुनीक वैद्यकीय सेवेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल हाॅस्पीटलमध्ये वारणा खोऱ्यातील ग्रामीण भागातील गोर- गरीबांच्या वैद्यकिय सुविधेसाठी अत्याधुनीक मोफत वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. सद्यस्थतीत येथे अस्थीरोग, सामान्य आणि लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, नेप्रोलाॅजी आणि जनरल फिजीशियन सेवा सुरु झाल्या आहेत. यासाठी तज्ञ डाॅक्टरांची टीम कार्यरत केली आहे.
या मोफत अत्याधुनीक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ वारणा समुहाचे प्रमुख आमदार डाॅ विनय कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना आमदार डाॅ विनय कोरे म्हणाले की, या रुग्णालयात मोफत वैद्यकिय, शस्त्रक्रिया आणि डायलेसिस सुविधा सुरु झाल्या असून लवकरच शासनाच्या उपचार मोफत योजनाही सूरू होतील. या रुग्णसेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन कोरे यांनी केले.
यावेळी प्रा. जीवनकुमार शिंदे, अस्थिरोगतज्ञ डाॅ. श्रेय वारे, सामान्य आणि लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तज्ञ डाॅ. समीर तौकारी, मूत्रपिंड तज्ञ डाॅ. दादा कोळी, जनरल फिजीशयन डाॅ. जयवंत पाटील, डाॅ. महेश्वर शितोळे, डाॅ. उमंग मलमे, ट्रस्टचे सचिव निलेश हुजरे, प्रशासकीय अधिकारी शिवरुद्र घोंगडे, पर्सोनोल अधिकारी सुधीर राऊत यांच्यासह हाॅस्पीटल प्रशासनाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
————————————————————————————–