माजी आमदार संजयबाबा घाटगे भाजपमध्ये , कोल्हापुरात राजकीय भूकंप

0
169
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

दुसऱ्या बाजूला संजय घाटगे यांचा पक्ष प्रवेश म्हणजे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांच्यासाठी  धक्का मानला जात आहे. समरजीत घाटगे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, हसन मुश्रीफांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये परतन्यास उत्सुक असल्याची चर्चा होती. पण, विधानसभा निवडणुकीत समजूत काढून पुन्हा न ऐकल्याचा राग मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्यात असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच वरिष्ठाकडून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे समजते. पण, आता संजय घाटगे आणि त्यांच्या पुत्राला भाजपने दार उघडल्याने समरजीत घाटगे यांची राजकीय कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे .

कागल हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय 

कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा असते. या मतदारसंघातून १९९८ सालच्या निवडणुकीत घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केले होते. त्यानंतर मात्र १९९९, २००४, २००९, २०१४,२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलं होतं. त्यांनी शिवसेना पक्षाकडून एकूण चार वेळा निवडणूक लढवलेली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी निवडणुक जिंकली. कागल हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. हसन मियालाल मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

२०२४ च्या विधानसभेत काय घडलं?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा विरोध होऊन सुद्धा विजय खेचून आणला होता. हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा ११ हजार ६०९ मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विजय खेचून आणला. त्यामुळे हसन मुश्रीफ पुन्हा एकदा कागलच्या रणांगणामध्ये बाजीगर ठरले. हसन मुश्रीफ अजित पवार गटांमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना बळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाई राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाला होता.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here