कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
“आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहाणारही आहे पण या महानगरपालिका निवडणुकीची जी काही जबाबदारी द्यायची आहे ती यांच्या पैकी कोणाला तरी द्या, पक्षात बाहेरून आलेल्यानां नको”, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील माजी नगरसेवकांनी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासमोर घेतली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उतरले आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये कॉँग्रेसच्याच एक नगरसेवच्या हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. कॉँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा एक गट नाराज असून तो दुसऱ्या एक पक्षात जाणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक चांगलेच आक्रमक जलेचे दिसत होते. “आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहाणारही आहे पण या महानगरपालिका निवडणुकीची जी काही जबाबदारी द्यायची आहे ती यांच्या पैकी कोणाला तरी द्या, पक्षात बाहेरून आलेल्यानां नको, अशी भूमिका घेतली.
यावेळी काही माजी नगरसेवकांनी दक्षिण विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका मांडल्या. यावेळी आमदार सतेज पाटील “यांनी झालं गेलं विसरून जाऊन आता जोमाने कामाला लागू” असे सांगून तुमच्या सूचनांचा विचार करू, असे आश्वासन दिले.
या स्नेहभोजनावेळी माजी गट नेते शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रकाश नाईकनवरे आणि दिलीप पोवार हे उपस्थित नव्हते.