Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातील 7 जागांपैकी 4 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखत भाजपने मराठा, ओबीसी, आदिवासी आणि मागासवर्गीय प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

भाजपचे जाहीर उमेदवार (महाराष्ट्र)

१) रामदास आठवले

२) विनोद तावडे

३) माया इवनाते

4) रामराव वडकुते

महाराष्ट्रातील विद्यमान संख्याबळानुसार भाजपचे चारही उमेदवार विजयी होण्याची शक्यता मजबूत मानली जात आहे.

निवडणूक वेळापत्रक

टप्पा तारीख
उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत 5 मार्च 2026
अर्जांची छाननी 6 मार्च 2026
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2026
मतदान 16 मार्च 2026 (सकाळी 9 ते सायं. 4)
मतमोजणी 16 मार्च 2026 (सायं. 5 नंतर)

महाराष्ट्रातील जागांचे गणित

  • एकूण जागा: 7

  • विद्यमान आमदार: 286

  • कोटा: 36 आमदार (3600 मते)

पक्षनिहाय स्थिती

पक्ष आमदार संख्या निश्चित जागा अतिरिक्त मते
भाजप 136 3 28
शिवसेना 56 1 20
राष्ट्रवादी 40 1 4
महायुती एकूण अतिरिक्त 52

 

  सहाव्या जागेनंतरही 16 मते अतिरिक्त राहतात.
  सातव्या उमेदवारासाठी आणखी 20 मतांची गरज.

महाविकास आघाडीची स्थिती

पक्ष आमदार एका जागेसाठी लागणारी अतिरिक्त मते
उबाठा 20 16
शरद पवार गट 10 26
काँग्रेस 16 20

 तीनही पक्ष एकत्र आल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
 काँग्रेस + उबाठा एकत्र आल्यास काठावरचे बहुमत शक्य.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य (महाराष्ट्र)

  • शरद पवार (श. प. गट)

  • रामदास आठवले (रिपाई)

  • फौजिया खान (श. प. गट)

  • रजनी पाटील (काँग्रेस)

  • प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे गट)

  • धैर्यशील पाटील (भाजप)

  • भागवत कराड (भाजप)

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here