शाहूवाडी : प्रसारमाध्यम न्यूज
शाहुवाडी तालुक्यातील देवघर सेवाधाम या आश्रमाला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोल्हापूर येथील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.
शाहूवाडी मध्ये गेली एकोणीस वर्षापासून सुरू असलेल्या देवघर सेवाधाम आश्रम हे आजही शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहिलेले आहे. या आश्रम मधील मुलांना सध्याची परिस्थिती पाहता एक वेळचे जेवणही मिळणे मुश्किल बनत चालले असतानाच आज गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून कोल्हापूर येथील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आश्रमामधील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना वेगवेगळे रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कमल ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक दातृत्ववान लोकांनी एक हात मदतीचा पुढे करत या आश्रमाला मदत करावी व या आश्रमातील अनाथ व निराधार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हातभार लावावा असे आव्हान ट्रस्टचे विश्वस्त दिपालीताई मल्ली यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली, दत्ता पाटील, दौलत पाटील, सागर पाटील, नेताजी देशमुख, मायकल अंताव, आश्रम चे दीपक बुचडे व त्यांचा परिवार शिक्षक उपस्थित होते.
——————————————————————————-



