कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक रात्रभर नागरिकांच्या मदत व बचाव कार्यात उतरले आहेत. पुराचा धोका ओळखून वेळेत स्थलांतर व्हा, जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे, अशा शब्दांत आवाहन करून जिल्हाधिकारी अमोल यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
दरम्यान, करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने हा मार्ग पहाटे पासून वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. योग्य तो बंदोबस्त हजर ठेवण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग- कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे यांनी दिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका स्थलांतरित कुटुंब माहिती
दिनांक २० ऑगस्ट, रात्री ११ वाजता – केएमसी निवारा केंद्र..- चित्रदुर्ग मठ
एकूण कुटुंब – १२, पुरुष- १८, स्त्री-१५, लहान मुले – १२, लहान मुली-६
एकूण-५१, स्थलांतरित झालेले ठिकाण — सुतारवाडा
—————————————————————————–