कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
योगात अनेक आसने असून वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना दूर करण्यात ही आसने मदत करतात. नियमित योग केल्याने अनेक गंभीर आजारापासून दूर राहता येते. परंतू लोकांना कामकाजामुळे वेळ काढता येत नाही. त्यामुळे ते आसने करु शकत नाहीत बाबा रामदेव यांनी यावर एक उपाय दिला आहे. त्यांनी ५ मिनिटांचा पॉवर योगा सांगितला आहे.
बाबारामदेव एका व्हिडीओत ५ मिनिटांच्या पॉवर योगा संदर्भात सांगत आहेत. त्यांनी काही सोपी आसने सांगितली, ज्याने संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होईल. या ५ मिनिटांच्या पॉवर योगात गदा फिरवणे, हनुमान दंड, सूर्य नमस्कार, चक्रासन, वज्रासन यांचा समावेश आहे.
चक्रासन
चक्रासनाने शरीराला अनेक फायदे मिळतात, त्याने माकड हाड मजबूत होते. शरीराचा आकार देखील प्रमाणबद्ध होतो. याशिवाय याने पचन यंत्रणा सुधारते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. ज्यांना जादा तणावाचा सामना करावा लागत असेल तर चक्रासनाचा फायदा होतो.
वज्रासन
वज्रासनामुळे पचन यंत्रणा चांगली होते. तसेच पाठीचे दुखणे देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते. तणाव कमी होतो. ५ मिनिटे वज्रासन केल्याने शरीराचे माकड सरळ होते. आणि एकाग्रता देखील वाढते.
सूर्य नमस्कार
पाच मिनिटांच्या पॉवर योगात सुर्य नमस्काराचा देखील समावेश आहे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी ५ मिनिटे सुर्य नमस्कार केल्याने दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते. स्नायू मजबूत बनतात. शरीराची लवचिकता वाढते. हृदयाचे आरोग्य चांगले पासून ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यापर्यंतसाठी सुर्यनमस्कार लाभदायक आहेत.