कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
डिजिटल इंडिया अभियानामुळे भारतात सरकारी सेवा आता अगदी स्मार्टफोनच्या एका टच वर उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये काही खास सरकारी अॅप्स अशी आहेत की ज्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हव्यात. या अॅप्समुळे तुमचं आयुष्य अधिक सोपं, पेपरलेस आणि सुरक्षित बनू शकतं.
चला पाहूया ही पाच अत्यावश्यक सरकारी अॅप्स आणि त्यांचा उपयोग
UMANG अॅप (Unified Mobile Application for New-age Governance)
हे अॅप म्हणजे सरकारी सेवा एका क्लिकवर आणणारा डिजिटल ब्रिज. आधार, गॅस बुकिंग, पासपोर्ट, बिल पेमेंट, डिजीलॉकर, ई-हॉस्पिटल, EPFO अशा एक हजार पेक्षा जास्त सेवा UMANG अॅपवर उपलब्ध आहेत. हे अॅप मराठीत असून, Android आणि iPhone दोन्हीवर मोफत मिळतं.
AIS अॅप (Annual Information Statement)
हे अॅप आयकर विभागाने सादर केलं असून, तुमच्या वित्तीय व्यवहारांची संपूर्ण माहिती (उदा. बँक व्याज, शेअर्स, म्युच्युअल फंड, TDS/TCS) पाहता येते. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरतं.
RBI Retail Direct अॅप
भारतीय रिझर्व्ह बँकेने तयार केलेलं हे अॅप सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारी बॉण्ड, ट्रेझरी बिल्स, राज्य सिक्युरिटीज, आणि सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड यामध्ये थेट गुंतवणूक करण्याची संधी देतं. मोफत खाते उघडणं आणि सहज वापरयोग्यता यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं आहे.
Digi Yatra अॅप
विमानप्रवास करणाऱ्यांसाठी Digi Yatra हे फेस रिकग्निशन तंत्रज्ञानावर आधारित अॅप आहे. एकदा नोंदणी केल्यावर, कोणतेही कागदपत्र न दाखवता, चेक-इन, सिक्युरिटी तपासणी आणि बोर्डिंग करता येतं. हे अॅप सध्या भारतातील २८ विमानतळांवर कार्यरत आहे.
Post Info अॅप
भारत सरकारच्या डाक विभागाने सादर केलेलं हे अॅप तुमच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पार्सल, मनी ऑर्डर ट्रॅकिंगसह विविध माहितींसाठी उपयुक्त आहे. पिनकोड तपासणी, जवळचं पोस्ट ऑफिस शोधणं, तसेच सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना यांची माहितीही यात मिळते.
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर ही पाच अॅप्स तुमच्या दैनंदिन गरजांचा डिजिटल आणि प्रभावी मार्ग ठरू शकतात. सरकारी सेवा वापरणं आता अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद झालं आहे. डिजिटल भारताची खरी अनुभूती घ्यायची असेल, तर ही अॅप्स आजच तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत!
——————————————————————————————–