मत्स्य व्यवसायाला अखेर कृषी दर्जा प्रदान : मच्छीमार बांधवासाठी सरकारचा गेम चेंजर निर्णय

0
140
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय आणि मच्छिमार बांधवासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला अखेर कृषी दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयाबद्दल कोळी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत मिळणार आहे. तसेच, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. यासोबतच, कृषी दरांनुसार कर्ज मिळण्यास मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक पात्र ठरणार आहेत.

आर्थिक मदत मिळण्यास मच्छीमार पात्र

त्यासोबतच आता मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सौर ऊर्जेच्या लाभांचाही लाभ घेता येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून (उदा. अॅक्वाकल्चर मत्स्यशेती) मत्स्यशेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यास मच्छीमार पात्र ठरणार आहेत. याव्यतिरिक्त, शीतगृह सुविधा आणि बर्फ कारखान्यांसाठी अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे निश्चितच राज्यातील मत्स्य व्यवसाय अधिक विकसित होईल. येत्या काही वर्षात महाराष्ट्र मत्स्य उत्पादनात पहिल्या तीन राज्यांमध्ये स्थान मिळवू शकेल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. हा निर्णय मच्छीमार बांधवांसाठी एक ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे होणार?
  • शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल.
  • किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.
  • कृषी दरांनुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील.
  • मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.
  • शेतकऱ्यांप्रमाणे सौर ऊर्जेचे लाभ मिळतील.
  • नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (उदा. अॅक्वाकल्चर मत्स्यशेती) मत्स्यशेती करण्यासाठी मच्छीमार पात्र होतील.
  • शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यांसाठी अनुदान मिळेल.
  • मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये नीलक्रांती घडेल व तरुणांना रोजगार मिळेल.
  • उपकरणे व यंत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील.
  • सागरी व अंतर्गत मासेमारी क्षेत्रामध्ये आर्थिक विकास होईल.
  • मच्छीमारांना शासनातर्फे डिझेल पंप मिळतील.
  • राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होणार.
  • मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅंडल व्हील एरेटरस, एअर पंप करीता अनुदान मिळणार.
  • नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळणार.
  • —————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here