मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून इतिहास घडवणाऱ्या सुरेखा यादव या या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 36 वर्षांची उत्कृष्ट सेवा दिली आहे. सुरेखा यादव १९८९ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्या होत्या. त्या मुळच्या साताऱ्यातील आहेत.
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यादव यांनी 1989 साली भारतीय रेल्वेमध्ये प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी, म्हणजे १९९० मध्ये सहाय्यक चालक म्हणून आपली सेवा सुरू केली. त्या काळात महिलांसाठी हा क्षेत्र दुर्लक्षित आणि कठीण मानला जात होता, मात्र सुरेखा यादव यांनी सर्व अडथळ्यांवर मात करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा महत्त्वाचे गाड्या चालवण्याची जबाबदारी पार पाडली. विशेषतः डेक्कन क्वीन एक्स्प्रेस चालवणारी पहिली महिला चालक म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांचे आत्मविश्वासपूर्ण आणि कुशल वाहन कौशल्य संपूर्ण देशात प्रेरणादायक ठरले.
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट बनलेल्या सुरेखा यादव 36 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरेखा यादव 1989 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्या आणि पुढील वर्षी सहाय्यक चालक म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर त्यांनी आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून इतिहास रचला.
सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यादव यांनी रेल्वेत रुजू होण्यापूर्वी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा मिळवला. पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी सातत्याने प्रगती केली. १९९६ मध्ये त्यांनी मालगाडी चालवायला सुरुवात केली आणि २००० पर्यंत ‘मोटर वुमन’ पदावर बढती मिळवली. पुढील दशकात त्यांनी फेरी चालक म्हणून पात्रता मिळवली आणि अखेर मेल व एक्सप्रेस गाड्यांचे कामकाज हाती घेतले.
सुरेखा यांनी १३ मार्च २०२३ रोजी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर पहिली वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी हजरत निजामुद्दीन (दिल्ली)-सीएसएमटी मार्गावरील राजधानी एक्सप्रेस चालवून आपले अंतिम काम पूर्ण केले. यादव यांची कारकीर्द भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय ठरला आहे आणि महिला सक्षमीकरणाचा एक शक्तिशाली संदेश जगासमोर मांडला आहे.