spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगवास्तुकला अभ्यासक्रमात फेरोसिमेंट तंत्रज्ञान

वास्तुकला अभ्यासक्रमात फेरोसिमेंट तंत्रज्ञान

पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पुणे येथे ‘ कला, विज्ञान व तंत्रज्ञानातील फेरोसिमेंटचे बांधकाम’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष अभय पुरोहित यांनी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वास्तुकला अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत आणि संशोधनासाठी बंगलोर येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जयंत इनामदार, बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, फेरोसिमेंट सोसायटीचे अध्यक्ष पी. पी. लेले, तसेच गिरीष सांगळे, नंदकुमार जाधव, पुष्यमित्र दिवेकर, परिषदेचे संयोजक डॉ. कल्याण सुंदरम्, व्हॅसकॉन इंजिनीअर्सचे प्रकल्प संचालक विवेक बोत्रे, अल्ट्राटेक सिमेंटचे संदीप बन्सल, आर्किटेक्ट्स इंजिनीअर्स ॲण्ड सव्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. महेश बांगड आणि सहनिमंत्रक डॉ. सुजाता मेहता उपस्थित होते.
अभय पुरोहित म्हणाले, “फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाला पूरक आहे. गुंतागुंतीच्या आकृतिबंधांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य झाला असून स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातही यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. स्थानिक कारागिरांसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोगाने फेरोसिमेंटमध्ये नव्या शक्यता आजमावणे आवश्यक आहे. त्रिमितीय मुद्रणाच्या क्षेत्रात वास्तू उभारणीसाठी फेरोसिमेंटचा क्रांतिकारी वापर करण्यावर संशोधन सुरू आहे. पर्यावरणपूरक, हलके, मजबूत आणि कमी खर्चिक असणारे हे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करू शकते, परंतु त्यासाठी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.”

फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि वापर यामुळे बांधकाम क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यासोबतच पर्यावरणीय शाश्वततेस हातभार लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय व उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने या संशोधनाला गती मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा उपक्रम भारताला जागतिक स्तरावर वास्तुकला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे स्थान मिळवून देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments