राधानगरी : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सूचना दिल्यानंतर आता शेतकऱ्यांना भात शेतीसाठी दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.
राधानगरी तालुक्यांमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते .परंतु दिवसा वीज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली जात होती. महावितरण कडून शेतीपंपाची वीज ही दिवसा चार व रात्रीची तीन दिवस असा नियम होता. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तो नियम बंद करून शेतकऱ्यांना सलग दिवस वीज उपलब्ध होणार आहे.
या मागणीसाठी शेतकरी दीपक शेट्टी, नंदकुमार सूर्यवंशी (सरकार), तानाजी चौगुले, राम कदम, उमेश जाधव, विजय डवर, विक्रम पारकर, विलास डवर, संतोष तायशेटे, मंगेश चौगुले यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व महावितरण कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता लटपटे, उप कार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांचे अभिनंदन केले.
————————————————————————————–



