राधानगरी : प्रतिनिधी
प्रशासनाने आमच्या मुलभूत हक्कासाठी अडवलेल्या रस्त्यावरील कुंपण काढून वाट मोकळी करावी आणि पक्का रस्ता द्यावा अन्यथा शासकीय कार्यालयावर तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा पाट पन्हाळा धनगरवाड्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा ग्रामपंचायत मध्ये समावेश असलेल्या धनगर वाड्यामध्ये तीनशेच्या आसपास लोकवस्ती आहे. गेली अनेक पिढ्या इथं हे लोक वास्तवास आहेत. मुख्य रस्त्यांपासून साडेसातशे फुटावर हा धनगरवाडा आहे. गेली अनेक वर्षांपासून इथले नागरिक पक्क्या रस्त्याची मागणी करत आहेत. पण अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. पक्क्या रस्त्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी काढून रस्त्यासाठी काही जमीन विकत घेतलीय यातही काही लोकांनी अडथळे निर्माण केले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांनी पाट पन्हाळा धनगर वाड्यावरील कायम वहिवाटीचा रस्ता पावसाळ्याच्या तोंडावरती चर मारून कुंपण घालून बंद केल्याने इथल्या नागरिकांना दळणवळणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संपदा तानाजी पाटील यांनी रस्त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहे पण काही शेतकरी आणि नागरिकांच्या अडवणुकीमूळ वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
——————————————————————————–



