कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
“आज केवळ मोठ्या शहरांमधील नव्हे, तर लहान गावांतील मुले सुद्धा अंतराळ संशोधनात आपले नाव उजळवू शकतात,” असे मत अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी व्यक्त केले. आयएसएसवर मुक्कामाला असलेल्या कॅप्टन शुक्ला यांनी मंगळवारी ( ८जुलै ) भारतीय विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. ते आज पुण्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. २५ जून रोजी शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ‘अॅक्सियम मिशन 4’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. या मोहिमेत ते मिशन पायलट आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करता यावे, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्ला यांनी इस्रोच्या विविध मोहिमा, उपग्रह प्रक्षेपण आणि चांद्रयान मिशनचा अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला.
“ज्या पद्धतीने इस्रोने सीमित साधनांमध्येही यश मिळवलं, त्याच पद्धतीने मेहनत आणि जिद्द असेल, तर कुठल्याही पार्श्वभूमीतील विद्यार्थी अंतराळात जाऊ शकतात,” असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. ‘अंतराळवीर कसे बनावे?’, ‘इस्रोत काम करण्यासाठी कोणते अभ्यासक्रम करावे लागतात?’ अशा प्रश्नांना त्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात अशा संवाद कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली.
————————————————————————————-