शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजे होते. त्यांनी कधीही कोणत्याही जातीचा, धर्माचा द्वेष केला नाही. आमच्या मनात आई-वडीलापेक्षाही शिवाजी महाराजांचे नाव मोठे आहे. इतके कार्य शिवाजी महाराजांचे आहे. विश्वास पाटील यांनी लिहिलेले इंग्रजी शिवचरित्र जगभर गाजेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या शिवचरित्राच्या प्रकाशान प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रम दिल्ली येथे झाला. विश्वास पाटील यांच्या शिवचरित्र पर दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.
गडकरी म्हणाले, शिवाजी महाराजांचे कार्य फार व्यापक आहे. ते कोणत्याही धर्माचा, जातीचा द्वेष करत नव्हते. महाराज धर्मनिरपेक्ष राजे होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक मोठ्या पदावर आणि मोठ्या संख्येने होते. महराजांनी प्रतापगडावार अफझलखानाचा वध केला. वधानंतर शिवाजी महाराजांनी अफजलखानची कबर सन्मानाने झाली पाहिजे असा आदेश महराजांनी दिला होता. शिव चरित्र वाचताना रोमांच उभे राहतात. विश्वास पाटील यांनी महाराजांचे इंग्रजी भाषेत लिहून फार मोठे काम केले आहे. विश्वास पाटील बहू आयामी आणि बहुश्रुत व्यक्तीमत्वाचे लेखक आहेत. पाटील यांच्या पानिपत, झाडाझडती, पांगिरा अशा अनेक कादंबऱ्या लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांनी इंग्रजीत लिहिलेली शिव चरित्रही लोकप्रिय होतील.



