spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeसामाजिकपरस्परांच्या गरजातून रोजगार निर्मिती

परस्परांच्या गरजातून रोजगार निर्मिती

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

मानव आणि समाज एकमेकांना पूरक आहेत. मानव विकासासाठी समाज आहे. समाज म्हणजे भिन्न पार्श्वभूमी असलेल्या जाती-वंश परंपरा संस्कृती कला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या समूहातून तयार झालेले लोक जे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र राहतात. समाजामध्ये परस्पर हिताला प्राधान्य दिले जाते. किंबहुना अशीच एकूण मानवजातीची परंपरा आहे. व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. यातून परस्परांचा लाभ होतो. रोजगार निर्मिती होते. अनेकांचा लाभ झाल्याने आर्थिक स्थर उचावतो. समाजाचा विकास होत राहतो. 

प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा भाग आहे. किंबहुना एकमेकाना मदत करून सर्वांचा विकास साधला जावा हेच मानवतेत अभिप्रेत आहे. हेच मानवाचे वैशिट्य आहे. मानवाचा समाजाशी घनिष्ठ आणि परस्पर अवलंबित संबंध आहे. माणूस संस्कृती, नियम, भूमिका याद्वारे स्वत:ला घडवत आसतो, तर समाज व्यक्तींच्या सामुहिक कृतीतून, परंपरेतून आणि विचारामधून टिकून राहतो व विकसित होतो. 
माणूस एकटा जगू शकत नाही. त्याला जगण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी समाजावर अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे, समाज व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच बनतो आणि टिकतो. मानव संस्कृतीचा निर्माता आहे आणि संस्कृतीनुसारच मानव जगत असतो. संस्कृतीत भाषा, कला, ज्ञान, चालीरीती आणि परंपरा यांचा समावेश असतो. समाज सांस्कृतिक परंपरा जतन करतो आणि त्या पिढ्यानपिढ्या पुढे नेतो. व्यक्ती समाजात भूमिका बजावते आणि समाजाला आकार देते, तर त्याचवेळी समाज व्यक्तीच्या विचारांना आणि वर्तनाला घडवतो. हा एक दुहेरी प्रवाह आहे. 
समाज व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अर्थपूर्ण संबंधांसारख्या आवश्यक गोष्टी पुरवून मानवी कल्याण साधतो. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून आणि एक सुरक्षित आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करून, समाज व्यक्तींना एकमेकांशी जोडले जाण्यास, समस्यांवर मात करण्यास आणि जीवनात समाधान मिळवण्यास मदत करतो. 
जीवनावश्यक गरजा, अन्य गरजा, परंपरा, चालीरीती, सवयी, नवनवीन फॅशन इत्यादीची पूर्तता करताना रोजगार निर्मिती होते. समाजात राहण्यासाठी किंवा समाजाशी एकरूप होण्यासाठी चालीरीती, परंपरा, सवयी, नवनवीन फॅशन स्विकाराव्या लागतात. हे टाळता येत नाही. यातून वस्तू, खाद्य पदार्थ, सेवा यांची विक्री होते. अशा पद्धतीने एकमेकांच्या गरजांची पूर्तता करताना रोजगार निर्मिती होते.

—————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments