हत्तीने ट्रॉली उलथवली; बैलगाडी भिरकावली

0
178
The elephant overturned the trolley.
Google search engine

चंदगड : प्रतिनिधी 

वैजनाथ डोंगर परिसरात चाळोबा गणेश हत्तीचे रौद्ररुप 

बुक्कीहाळ खुर्द येथे गेल्या महिन्यापासून बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीकडून वाहनावरील हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि. २१) मध्यरात्री त्याने अतिवाड फाट्याजवळील वैजनाथ डोंगर परिसर शिवारातील ट्रॉली उलथवून टाकली. तर बैलगाडीची मोडतोड करुन भिरकावून दिली. आजरा येथून हा हत्ती महिन्यापूर्वी बेळगावच्या सीमेवर आला आहे.

पावसामुळे बचावले

हत्तीने उलथवून टाकलेल्या ट्रॉलीत रोज रात्री रखवालीसाठी बुकिहाळमधील शिवाजी बिजे, यश बिर्जे, आदित्य बिर्जे, सोमनाथ दळवी, गुंडू बिर्जे, ओमकार अमरोळकर, परशराम बिर्जे, रोशन बिर्जे आदी शेतकरी झोपायचे. रात्री गव्यांना हुसकावून लावायचे व ट्रॉलीत झोपायचे, असे त्यांचा रात्रक्रम होता. मात्र, बुधवारी रात्री पावसाने जीर केल्याने सदर शेतकरी पीक रखवालीसाठी गेले नाहीत, त्यामुळे, त्यांचा जीव बचावला.

बुधवारी रात्री सीमेवरील बुक्कीहाळ खुर्द शिवारात चाळोबा गणेश हत्तीने मोठा धुडगूस घातला. या ठिकाणी बारदेसकर नावाच्या शेतात रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिवाजी बिर्जे यांची ट्रॉली पार्क केली होती. सदर ट्रॉली हत्तीने उलथवून टाकली. रात्री पिकांचे गव्यांपासून रक्षण करण्यासाठी जाणारे शेतकरी या ट्रॉलीमध्ये झोपत होते. मात्र, पावसामुळे ते बुधवारी रात्री ते पिकांच्या रक्षणासाठी न गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

एवढ्यावरच न थांबता जवळय असलेली गुंडू बिर्जे यांची बैलगाडी भिरकावून दिली. त्यानंतर त्याने शेजारील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीची अनेक झाडे टाकली आहेत. घटनास्थळी चंदगडचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याचे आवळे यांनी सांगितले.

———————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here