प्रसारमाध्यम डेस्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. सन २०१५ पासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूका चार महिन्याच्या आत होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या आणि उर्वरित वादाचे मुद्दे टाळा असे सुप्रिम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ४ आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील इच्छुकांची पळापळ सुरु झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुका सन २०१५ पासून कोरोना, आरक्षणाचा वाद आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित होत्या. पण आता लवकरच या निवडणुकींचा मार्ग रिकामा होणार आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि २०१७ पासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या रडारवर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची शेवटची निवडणूक २०१५ झाली होती म्हणजे या महानगरपालिकेच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची आणि तालुका पंचायत समित्यांची सन २०२२ मुदत संपली होती यानंतर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील राजकीय वातावर तापायला सुरवात होईल.
कोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार?
- मुंबई
- ठाणे
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- छत्रपती संभाजी नगर
- कोल्हापूर