Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

‘सुटा’चे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. के. चव्हाण यांची महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे महासचिव म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे, असे पत्र ‘सुटा’चे उपाध्यक्ष प्राचार्य. डॉ. आर. जी. कोरबू यांनी प्रसिद्ध दिले. आहे ही निवड दोन वर्षासाठी आहे.

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे विद्यापीठ अतिथीगृह येथे दिनांक 1 मार्च 2026 रोजी संपन्न झाली, त्या सभेमध्ये राज्यातील अकरा विद्यापीठांच्या संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एम. फुकटोच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. प्रवीण रघुवंशी (अमरावती ) यांची तर प्राचार्य डॉ. आर. के. चव्हाण यांची महासचिव पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तसेच ‘सुटा’ चे प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांची एम फुकटो चे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा कार्यवाह प्राचार्य डॉ. गजानन चव्हाण व सातारचे डॉ. राजेश निमट यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. ‘सुटा’ला सुमारे वीस वर्षानंतर महासचिव पदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी ‘सुटा’चे प्रा. सी. आर. पाटील यांना महासचिव म्हणून संधी मिळाली होती. तसेच ‘सुटा’ला यावेळी महासचिव व उपाध्यक्ष ही दोन पदे सुद्धा प्रथमच मिळाली आहेत. ‘सुटा’चे एम फक्त मधील कामगिरीमुळे ही दोन्ही पदे ‘सुटा’यला मिळाली आहेत. त्याबद्दल डॉ. प्रा. आर. के. चव्हाण व डॉ. प्रकाश कुंभार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here