देशातली सर्वांत मोठी घडामोड ! राहुल गांधी, सोनिया गांधीं विरोधात ED कडून आरोपपत्र दाखल !

0
172
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम ब्रेकिंग न्यूज

पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार

या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन दुबे तसेच अन्य लोकांचीही नावे आहेत. असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्ष कायदेशीर सल्ला घेत आहे. वकिलांकडून योग्य तो सल्ला घेऊन राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्ष आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे.

एकूण 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड तसेच यंग इंडियाची साधारण 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलेली आहे. कोट्यवधींची ही संपत्ती ही वाममार्गाने जमवलेली आहे, असा आरोप आहे. याच आरोपाअंतर्गत ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत दिल्ली, मुंबई आणि लखनौ येते ही जप्तीची कारवाई केलेली आहे. यातील एकूण 661.69 कोटी रुपयांची संपत्ती ही असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि 90.21 कोटी रुपयांची संपत्ती ही यंग इंडियाशी संबंधित आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here