कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्नधान्ये आरोग्यास चांगली असून त्यातून ग्रामीण भागात नवी अर्थव्यवस्था आकारास येईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले. शांतिनिकेतन शाळेसमोर इकोस्वास्थ्य कोल्हापूर च्या वतीने भरवलेल्या सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डाॅ. पाटील पुढे म्हणाले की, अशा पद्धतीने पिकविलेल्या शेतीमालास इकोस्वास्थ्य च्या वतीने कोल्हापुरात कायमस्वरूपी सेंद्रिय शेती उत्पादन विषयक सल्ला, मार्गदर्शन, प्रदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध केल्यास ग्राहक आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच कोल्हापुरात सुरू झालेला हा उपक्रम इतत्रही पसरेल.
या कार्यक्रमास डॉ. दिलीप माळी, सुधीर हंजे, डॉ. तृप्ती करेकट्टी, शरद आजगेकर, वसीम सरकावस, उन्मेष साठे आणि कोल्हापूर परिसरातील सेंद्रिय उत्पादक हजर होते.
प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार या विषयावर इकोस्वास्थ च्या वतीने लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजय त्यांचा सत्कार प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
विक्री प्रदर्शनात नैसर्गिक उत्पादनांचे २५ स्टॉल असून रविवारी रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहील.
—————————————————————————————————