देशभरात ई-पासपोर्ट सेवा सुरू

पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.०

0
129
The Ministry of External Affairs has formally launched e-passport services across the country under the Passport Seva Programme 2.0.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० अंतर्गत देशभरात ई-पासपोर्ट सेवा औपचारिकरित्या सुरु केली आहे. याआधी ही सेवा केवळ चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सूरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, रांची आणि दिल्ली येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवर उपलब्ध होती. आता हळूहळू देशभरातील इतर केंद्रांवर ही सुविधा पोहोचणार आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे काय ?

ई-पासपोर्ट पारंपारिक पासपोर्ट सारखा दिसतो, पण त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. कव्हरवर RFID चिप आणि ॲन्टेना असतात. यात पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने सुरक्षित राहते, ज्यात बोटांची ठसे आणि डिजिटल फोटो यांचा समावेश आहे. कव्हरवरील “Passport” शब्दाखाली सोनेरी चिन्ह असल्यामुळे लगेच ओळखता येते. हा पासपोर्ट जागतिक ICAO मानांकनानुसार तयार केला गेला असून, जगभरात त्याला मान्यता आहे.

अर्ज कसा करावा ?
  • पासपोर्ट सेवा पोर्टलवर नोंदणी किंवा लॉगिन करा.
  • ऑनलाईन अर्ज भरा व जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडा.
  • निश्चित शुल्क ऑनलाईन जमा करा व अपॉइंटमेंट बुक करा.
  • निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर पोहचा.
  • व्हेरिफिकेशन आणि बायोमॅट्रिक कॅप्चर नंतर ई-पासपोर्ट वितरित केला जाईल.
ई-पासपोर्टचे फायदे
  • चिपमधील डेटा बदलणे किंवा बोगसपणा करणे अशक्य.
  • विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेला वेग, ऑटोमेटेड ई-गेट्सवर फायदा.
  • जगभरात मान्यता प्राप्त.
  • इलेक्ट्रॉनिक आणि बायोमॅट्रिक फीचर्समुळे माहिती सुरक्षित.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या नव्या डिजिटल पासपोर्टमुळे नागरिकांची माहिती अधिक सुरक्षित राहील आणि पासपोर्ट सेवा अधिक जलद व सोपी होईल.
——————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here