कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शहरी भागांतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नागरिकांना स्वस्त, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ई-बाईक म्हणजेच इलेक्ट्रिक बाईकचा उपयोग टॅक्सी सेवेसाठी केला जाईल. यामध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इंधनाचा खर्च कमी होतो, तसेच कार्बन उत्सर्जनही नगण्य असतो. त्यामुळे ही सेवा पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
सरकारच्या धोरणानुसार, ई-बाईक टॅक्सी सेवा प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम सुरू करण्यात येईल. यासाठी स्थानिक ट्रान्सपोर्ट अॅप्सना परवाने देण्यात येतील, तसेच नवीन स्टार्टअप्सनाही या क्षेत्रात संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकार लवकरच ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. ही सेवा ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप-आधारित सेवांप्रमाणे काम करेल. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशात १० हजार आणि संपूर्ण महाराष्ट्रात २० हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
ई-बाईक टॅक्सी सेवेचे फायदे:
-
शहरी भागात वाहतुकीचा ताण कमी होईल.
-
प्रवासाचा खर्च सामान्य नागरिकांसाठी परवडणारा असेल.
-
इलेक्ट्रिकआणि दुचाकी असल्याने प्रदूषणात लक्षणीय घट होईल.
-
पार्किंग समस्येवर मात करता येईल.
हा उपक्रम हरित वाहतूक (Green Mobility) धोरणाचा भाग असून, पुढील काही महिन्यांत ही सेवा प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. लवकरच नागरिकांना त्यांच्या मोबाईल अॅपद्वारे ई-बाईक टॅक्सी बुक करण्याची सुविधा मिळणार आहे.
टॅक्सी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर मुंबईतील काळी पिवळी कार येते. अशा टॅक्सी बहुतांशी शहरात आहेत. डीझेल, पेट्रोल, सीएनजी इंधनावर चालणाऱ्या टॅक्सी-कार आहेत.नुकतीच राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवेस परवानगी दिलेली आहे. टॅक्सी चा मराठीत अर्थ भाड्याने घेण्याची गाडी असा आहे. राज्य सरकारने आता इलेक्ट्रिक बाईकना प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे.