पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) आणि मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक ( बीएलओ सुपरवायझर ) यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही सुधारित मानधन रचना १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली.



