कोल्हापूर: प्रसारमाध्यम न्यूज
सिंचन घोटाळ्याच्या ७० हजार कोटीच्या घोटाळ्याच्या गाडीभर पुराव्यासह फाईलींचा तुम्ही कसा अभ्यास केला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. तशीच अवस्था आता कर्जमाफीची समिती करून होईल, अशा शब्दांत माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर, अमरावतीतील बच्चू कडू यांचे उपोषण आणि मागण्या लक्षात घेऊन, फडणवीस यांनी ताबडतोब एक समिती स्थापन करण्याचेही जाहीर केले आहे.
या समितीत बच्चू कडूंना सहभागी करून समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफीसंबंधी निर्णय घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी, देवेंद्रजी सिंचन घोटाळ्याच्या ७० हजार कोटीच्या घोटाळ्याच्या गाडीभर पुराव्यासह फाईलींचा तुम्ही कसा अभ्यास केला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. तशीच अवस्था आता कर्जमाफीची समिती करून होईल, अशी टीका केली आहे.
—————————————————————————————–