कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर स्थानकातून धावणाऱ्या तीन विशेष गाड्यांच्या एकूण १६० फेऱ्या होणार असून, मुंबई, कलबुर्गी आणि बिहारमधील कटिहारपर्यंतचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
कोल्हापूर – कलबुर्गी मार्ग
( गाडी क्रमांक – 01209/01210)
कालावधी : २९ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर
आठवड्यातील ६ दिवस ( शुक्रवार वगळता ) धावणार
वेळापत्रक
कोल्हापूरहून सकाळी ६:१० वाजता सुटणार व दुपारी ४:१० वाजता कलबुर्गीत पोहोचणार.
कलबुर्गीतून सायं. ६:१० वाजता सुटून, दुसऱ्या दिवशी पहाटे ५:४० वाजता कोल्हापूरात पोहोचणार.
फेऱ्या : ११६
कोल्हापूर – कटिहार मार्ग
(गाडी क्रमांक 01405/01406)
कालावधी : १४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर
साप्ताहिक स्पेशल
वेळापत्रक
कोल्हापूरहून रविवारी सकाळी ९:३६ वाजता सुटून, मंगळवारी सकाळी ६:१० वाजता कटिहारमध्ये पोहोचणार.
परतीसाठी मंगळवारी सायं. ६:१० वाजता कटिहारहून सुटून, गुरुवारी दुपारी ३:३५ वाजता कोल्हापूरात पोहोचणार.
फेऱ्या : २४
कोल्हापूर – मुंबई मार्ग
( गाडी क्रमांक – 01417/01418)
कालावधी : २४ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर
साप्ताहिक स्पेशल
वेळापत्रक
कोल्हापूरहून बुधवारी रात्री १०:०० वाजता सुटून, दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईत पोहोचणार.
परतीसाठी मुंबईतून गुरुवारी दुपारी २:३० वाजता सुटून, शुक्रवारी पहाटे ४:२० वाजता कोल्हापूरात पोहोचणार.
एकूण फेऱ्या : २०
कोल्हापूर–कलबुर्गी : ११६
कोल्हापूर–कटिहार : २४
कोल्हापूर–मुंबई : २०
एकूण : १६० फेऱ्या
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोल्हापूरकरांसह महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई, मराठवाडा तसेच बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षित करून वेळेत प्रवासाची आखणी करण्याचे आवाहन केले आहे.
——————————————————————————————-