
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधीमंडळात चर्चा झाली. यासाठी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली मध्ये आवश्यक बदल करता येतील का, हे तपासण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.
विधीमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. पुर्तता प्रमाणपत्र आणि वास्तव्य प्रमाणपत्र देताना तत्काळ घरफाळा आकारण्याची तरतूद केल्यास महानगरपालिकांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे यावेळी सुचवण्यात आले. यासाठी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली मध्ये आवश्यक बदल करता येतील का, हे तपासण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.
देशातील अनेक महानगरपालिका बॉंड्सच्या माध्यमातून निधी उभारतात त्या धर्तीवर महाराष्ट्रातील महानगरपालिकांनीही अशा पद्धतीने निधी उभारावा, यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत आणि महानगरपालिकांना बॉंड्सच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी ठोस विचार केला जाईल, असे आश्वस्त केले.
——————————————————————————————





