सोशल मीडियावर Vibes घालणार धुमाकूळ 

0
82
Meta has recently launched a new AI-based video feed called ‘Vibes’.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

सोशल मीडियाच्या जगात आता मोठा बदल होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. फेसबुक, इंस्टाग्रामची मालकी असलेल्या Meta कंपनीने नुकताच ‘Vibes’ नावाचा नवा AI-आधारित व्हिडीओ फीड लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते AI-जनरेटेड व्हिडीओ स्वतः तयार करू शकतील, त्यांचे रीमिक्स करू शकतील आणि शेअरही करू शकतील.

Vibes हा मेटाचा एक AI व्हिडीओ फीड आहे, जो केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या कंटेंटसाठी आहे. इतर सोशल मीडियावर जसे लोक स्वतःचे व्हिडीओ अपलोड करतात, तसं इथे होत नाही. फक्त वापरकर्त्याने दिलेल्या प्रॉम्प्टवरून AI आपोआप व्हिडीओ तयार करतो.

कसे वापरायचे Vibes?
  • Meta AI अ‍ॅप किंवा मेटाच्या वेबसाइट द्वारे Vibes ला अ‍ॅक्सेस करता येईल.

  • हे एक प्रकारचे क्रिएटिव्ह हब आहे, जिथे वापरकर्ते मजकूर प्रॉम्प्ट देऊन चुटकीसरशी AI व्हिडीओ तयार करू शकतात.

  • आवडलेला व्हिडीओ रीमिक्स करता येतो.

    • नवीन म्युझिक घालणे

    • व्हिज्युअल्स बदलणे

    • नवीन प्रॉम्प्ट देऊन एक संपूर्ण वेगळा व्हिडीओ तयार करणे शक्य आहे.

मेटाची सरस बाजी

सोशल मीडियामध्ये AI-जनरेटेड कंटेंटची नवीन श्रेणी निर्माण करण्यासाठी मेटाने हा मोठा डाव खेळला आहे. यामुळे TikTok, YouTube Shorts, Snapchat सारख्या प्लॅटफॉर्मना टक्कर मिळू शकते, जे आजही युजर्सच्या कंटेंटवर अवलंबून आहेत.
काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी बंद पडलेली Vine अ‍ॅप पुन्हा सुरू करण्याचा विचार मांडला होता, ज्यामध्ये AI व्हिडीओ दाखवले जातील. मात्र, मस्क यांची योजना प्रत्यक्षात येण्याआधीच Meta ने ‘Vibes’ लाँच करून आघाडी घेतली आहे.

Vibes वर तयार झालेले व्हिडीओ थेट Instagram आणि Facebook च्या स्टोरीज किंवा रील्समध्ये शेअर करता येतील. यामुळे मेटाच्या इकोसिस्टममध्ये या नव्या फीडचं एकत्रीकरण सहज शक्य झालं आहे. Meta चं Vibes हे प्लॅटफॉर्म केवळ एक नवं फीचर नाही, तर सोशल मीडियातील AI-क्रांतीचं दार उघडणारं पाऊल आहे. AI च्या मदतीने कोणताही युजर क्रिएटर होऊ शकतो आणि कंटेंट निर्मितीचं स्वरूप पूर्णपणे बदलण्याची क्षमता या प्लॅटफॉर्ममध्ये आहे.

—————————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here