कागल तालुक्यात विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम संपन्न

0
394
MP Dhananjay Mahadik was the chief guest at various agricultural programs in Siddhannerli and Vhanali in Kagal taluka.
Google search engine

कागल : प्रसारमाध्यम न्यूज 

कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या पुढाकारातून १२ जून २०२५ पर्यंत विकसित कृषी संकल्प अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नुकतेच कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली व व्हनाळी येथे कृषी विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी तज्ञांनी ऊस शेती आणि खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि दुग्धव्यवसायातील संधी, शेतकऱ्यांना कृषीच्या विविध योजनांची माहिती व सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन केले.

डॉ. रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख सिध्दगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि शेतकऱ्यानी जास्तीत जास्त या अभियानामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

डॉ. विद्या सागर गेडम, ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांनी ऊस पिकावर सखोल मार्गदर्शन केले. आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी फार्मर आयडी, माती परीक्षणाचे महत्व, कृषी योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमास आत्मा व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी, शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी, शेतकरी कंपनीचे सदस्य, महिला उद्योजक उपस्थित होते.

—————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here