संपर्कात असूनही विसंवादात ! दररोज ६ तास मोबाईलवर, माहितीपेक्षा मेम्स, आणि अनुभवापेक्षा रील्सवर जास्त विश्वास!

0
240
Google search engine

प्रसारमाध्यम विशेष

एकेकाळी माणूस माणसाशी बोलायचा. आता तो स्क्रीनशी बोलतो ! चहाला शेजारी माणूस नसतो, पण मोबाइल हमखास असतो. “जग आपल्या बोटांच्या टोकावर आहे” म्हणत म्हणत, आपणच त्या बोटांमध्ये अडकलो आहोत.
जगभरात आज सरासरी प्रत्येक व्यक्ती दररोज ६ तास इंटरनेटवर घालवते. पण खरा प्रश्न आहे – काय मिळतंय त्या वेळात ? माहितीचं सोनं की भ्रमाचा भोपळा ?

माहितीचा महापूर की फॉरवर्डचा ताप ?

व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब – सगळीकडून माहितीचा महापूर चालू आहे. पण त्यात किती माहिती “माहिती” आहे, आणि किती केवळ “एका मावशीच्या नातवाच्या शेजाऱ्याच्या मित्राने सांगितलेली” आहे, हेच कळेनासं झालंय !

कधी कधी वाटतं – माहितीपेक्षा ‘फॉरवर्ड’ हा शब्दच जास्त प्रचलित झाला आहे.
“हे पहा, नक्की बघा, खूप महत्वाचं आहे” – असं लिहून आलेला मेसेज वाचायच्या आधीच आपोआप शेअर होतो. माहिती की अफवा, हे तपासण्याची गरज कुणालाच वाटत नाही !

प्रत्यक्ष अनुभव… की १० सेकंदांची रील ?

एवढं सगळं पाहून एक प्रश्न नक्कीच पडतो –
“आपण खरंच काही अनुभवतोय का, की फक्त मोबाईलवर बघतोय ?”
हातातली आईस्क्रीम खाण्याऐवजी तिचं फोटो काढून स्टोरी टाकणं हा आपला नवा “अनुभव” झालाय.
आपण एवढं रील्समध्ये हरवून गेलोय की खरा आयुष्याचा रिअल अनुभव कधी घेतलाय, आठवतही नाही !

नातं जपायला इंटरनेट लागते का ?

घरातले लोक बाजूला असतात, पण आपण त्यांना online स्टेटसवर बघतो. आजोबा खरं बोलतात –
“एव्हढं मोबाईलमध्ये काय आहे रे ? आमचं प्रेम पत्र ८ दिवसात पोचायचं, तरीसुद्धा भावना पोचायच्या !”
आता तर “seen” झालं तरी भावना पोचत नाहीत !

थोडं हसू… थोडं भान !

तंत्रज्ञानाचं भान राखायला कुणी वेगळं येणार नाही.
आपणच सुरुवात करायला हवी –

स्क्रीन टाईम मोजा – फोन नाही, स्वतःकडे बघा

माहितीची खात्री करा – प्रत्येक फॉरवर्ड ‘fact’ नसतो

लिंक शेअर करा – डाउनलोडचा डोंगर नको

आठवड्यातून एक दिवस – फक्त फॅमिली फ्रेंड्स फेस टू फेस

रील्सऐवजी रिलेशन जपा !

शेवटी – ‘क्लिक’ पेक्षा ‘कनेक्शन’ जास्त महत्वाचं !

तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण ते मनात जाऊ नये.

‘मोबाईल’ बाजूला ठेवा – माणूस जवळ आणा !

जग बदलेल, पण आधी आपला मोबाईल म्युट करा… आणि स्वतःशी जरा बोलून बघा !

आयुष्याची बॅटरी 100% आहे, हे लक्षात ठेवा – फक्त चार्जिंगच्या शोधात राहू नका !

————————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here