कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना भविष्यात कधीच बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. लाडकी बहीण योजनेसाठी पर्याप्त आर्थिक तरतूद केली आहे, यामुळे ही योजना कधीच बंद होणार नाही असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिलांना चांगल्या प्रकारे मिळत आहे. विरोधकांनी योजनेबद्दल अफवा पसरवल्या आहेत की ती बंद होऊ शकते पण शिंदे यांनी या अटकळांचे खंडन केले आहे. माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपयेची आर्थिक मदत मिळते.या योजनेसाठी सरकारने आर्थिक तरतूद केली असून ती योजनेला आवश्यक तो पाठबळ मिळत आहे.
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली असल्याचे म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या जीवनात परिवर्तन यावं, जीवनात सुख, समृद्धी यावी. आणि त्या त्यांच्या पायवर उभ्या राहाव्या, यासाठी ही योजना सुरु केली आहे. विरोधक ई-केवायसीबद्दल अफवा पसरवत आहेत. परंतु बँकेद्वारे मिळणारी रक्कम सुलभतेने मिळावी. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करण्यात येणार आहे असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ई-केवायसीबद्दल कोणीही मनात संभ्रम करु नये. ई-केवायसीमुळे पारदर्शकता, सुलभता आणि सुटसुटीतपणा येईल. विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. योजना सुरु केली, तेव्हाही विरोधकांनी याचा अपप्रचार केला. परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली आहे. ज्या योजना सुरु केल्या. त्या कधीही बंद होणार नाहीत. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे, त्या टप्प्या टप्प्याने सुरु करणार आहे”, असे शिंदे यांनी सांगितले आहे.