पुणे : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता ही कागदपत्रे १५ सप्टेंबर पर्यंत सादर करता येणार असून संबंधितांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
शिक्षण आयुक्तांनी विभागीय मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व वेतन अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
या संदर्भातील पहिल्या सूचना १६ जुलै रोजी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण कामकाज लक्षात घेऊन आता ही मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत खासगी शाळांमधील सुमारे ४५ टक्के कामकाज पूर्ण झाले असल्याची माहितीही देण्यात आली.
नवीन निर्णयानुसार, डीडीओ-१ आणि मुख्याध्यापक यांच्याच लॉगिनमधून ही कागदपत्रे अपलोड करता येणार असून वेळेत कामकाज पूर्ण व्हावे यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
————————————————————————————————-



