शेतकऱ्यांची मागणी मान्य –
गेली अनेक वर्षे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत होते. दिवसा बारा तास अखंडित वीज पुरवठा केल्यास शेतकऱ्यांचा जीवालाही धोका निर्माण होणार नाही. राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू असली तरी, वीज पुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नव्हता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, दिवसा वीज देण्याची घोषणा यापूर्वीही झाली होती, पण व्यवहारात ती अंमलात आणली गेली नाही. या वेळी शासनाने फक्त घोषणा न करता, सर्व भागांमध्ये अखंडित आणि नियमित वीज पुरवठा होईल याची खात्री द्यावी.
नवीन धोरण –
या निर्णयामुळे राज्यात नवीन वीज वितरण आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्मार्ट लोड मॅनेजमेंट करावं लागणार असून, उत्पन्न आणि मागणी यामध्ये संतुलन साधणं हे मोठं आव्हान असेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा दैनंदिन धोका कमी होईल आणि शेतीची उत्पादकता व सुरक्षितता वाढेल, अशी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
———————————————————————————————–