कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दशभुजा गणपती दर्शनाच्या दुर्मीळ योगाला रविवारी रात्री ८ वाजून १ मिनिटाने प्रारंभ झाला. हा योग सोमवारी ( दि १२ ) रात्री दहा वाजून २५ मिनिटांपर्यंत आहे.
कोल्हापुर शाहूपुरी सातवी गल्ली येथील पंचमुखी दशभुजा गणेश मंदिरात पुष्टीपती विनायक जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने दशभुजा गणपती दर्शन घेतले जाते. हा दुर्मिळ योग रविवारी रात्री सुरू झाला असून सोमवारी ( दि १२) रात्री दहा वाजून २५ मिनिटांपर्यंत आहे. या दुर्मीळ योगकाळात गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी शनिवारी रात्रीपासूनच गर्दी केली. तसेच सोमवारीही दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने संयोजकांतर्फे नियोजन केले आहे.
पुष्टीपती विनायक जयंतीला दशभुजा व पंचमुखी गणपतीचे दर्शन घेणे महत्त्वाचे मानले जाते. असा योग दुर्मीळ असतो. दहा भुजांपैकी चार हात गणपतीचे, सहा हात शिव विष्णू व शक्तीचे मानले जातात, असा संदर्भ गणेशकोशात आढळून येतो. पंचमुखी गणेशमूर्ती पृथ्वी, आकाश वायू, अग्नी व जल यांचे प्रतीक आहे.
या योगावर दर्शन घेतल्याने भाविकांना शक्ती मिळते अशीही आख्यायिका आहे. नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणे यानंतर कोल्हापुरातच हे मंदिर आहे. त्यामुळे दुर्मीळ योगावर गणपतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे.
——————————————————————————————-