Heavy rains in Maharashtra over the last fifteen days have led to a significant increase in dam storage.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या मिळून २९९७ धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा तब्बल ८६.२०% वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच वेळी हा साठा ७७.३५% इतकाच होता. यंदा सर्व विभागांमध्ये समाधानकारक पाणी असून, अनेक धरणं तुडुंब भरली आहेत.
विभागनिहाय धरणसाठा (४ सप्टेंबर २०२५ पर्यंत )
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर ( राधानगरी ) : ९९.२५%
दुधगंगा : ८२.७८%
सांगली (वारणा ) : ९६.६८%
सातारा ( कोयना ) : ९८.४९%
सोलापूर ( उजनी ) : १००%
कोकण विभाग : ९२.६५%
पुणे विभाग : ९१.७४%
नाशिक विभाग : ८०.४६%
छत्रपती संभाजीनगर ( मराठवाडा ) विभाग : ८१.३६%
अमरावती विभाग : ८५.०२%
नागपूर विभाग : ७८.८१%
मराठवाड्यातील धरणं ‘फुल्ल’
गेल्या वर्षी ५१.७७% असणारा मराठवाड्यातील एकूण साठा यंदा ९४.३४% वर गेला आहे.
जोरदार पावसामुळे अनेक नद्या-नाले तुडुंब भरले. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही धरणसाठ्यात झालेल्या वाढीमुळे खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध राहणार असल्याचा दिलासा मिळतोय.