पन्हाळा : प्रतिनिधी
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांकडून शिगांव येथे महिलांना दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ व्यवसायाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
दुग्धोत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्हाही ऊस शेतीबरोबरच दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध्द आहे. विविध गावमध्ये महिला दुग्व्यव्यवसायात कार्यरत आहे. दुग्धव्यवसायात वाढ व्हावी व शेतकऱ्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा व्हावा यासाठी कृषी कन्यांकडून शिगावमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
कृषीकन्यांनी शेतकरी महिलांना दुधापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांची माहिती दिली. यामध्ये लस्सी, खवा, बासुंदी, रसगुल्ला, गुलाबजामून, पनीर, आईस्क्रीम यांच्या पाककृतीची माहिती देऊन या पदार्थांना बाजारपेठे असलेल्या वाढत्या मागणीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. त्याचबरोबर महिलांना खवा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये महाविद्यालयाच्या कृषी कन्या साक्षी देसाई, श्रद्धा पाटील, आदिती पाटील, प्रतीक्षा कोळी, सेजल साबळे, माधुरी धनगर आदी सहभागी झाल्या. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकेडेमीक इनचार्ज प्रा. आर. आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एम. एन. केंगरे व विषय तज्ज्ञ डॉ. के. बी. कांबळे इत्यादीचे मार्गदर्शन लाभले.