डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा चार दशकांचा प्रवास अभिमानास्पद

डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, ४१ वा वर्धापन दिन उत्साहात

0
342
Kasba Bawda: Dr. Sanjay D. Patil celebrated the anniversary by cutting a cake. On this occasion, Prithviraj Patil, Dr. V. V. Bhosale, Dr. Ajit Patil, Dr. Santosh Chede, Srilekha Satam, Dr. Mahadev Narke, Dr. Leetesh Malde etc. were present.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४ दशकांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने हजारो अभियंत्यांना घडवले असून ते आज भारतासह जगभर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचे फार मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४१ व्या व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सिंगापूरहून ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होत शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यानी १९८४ मध्ये कसबा बावडा येथे सुरू केलेल्या ग्रुपच्या या पहिल्या महाविद्यालयाने प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठले आहेत. त्याचबरोबर दोनच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटनेही उत्तम प्रगती केली आहे. यापुढेही अधिक चांगल्या सुविधा व अत्यधुनिक अभ्यसक्रमासह उत्तम अभियंते, व्यवस्थापन अधिकारी घडवण्याचे कार्य सुरुच राहील अशी ग्वाही यावेळी डॉ. पाटील यांनी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी वयाच्या २४ व्या वर्षी आपल्याकडे महाविद्यालयाची जबाबदारी दिली. केवळ २४८ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली वाटचाल आज ५ हजार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली आहे. २०१६ मध्ये  माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे आपण संस्थेची जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. ए. के. गुप्ता यांच्या सहकार्याने आज महाविद्यालयाचा चौफेर विकास सुरु आहे. संस्थेने सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. जागतिक दर्जाच्या विविध संस्थांशी करार, आधुनिक सुविधा, संशोधनावर भर, एक्स्चेंज व एक्स्पांशन या माध्यमातून येत्या १० वर्षात दोन्ही संस्था सर्वांच्या सहकार्याने नव्या उंचीवर नेऊया असे आवाहन त्यांनी केले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व सहकाऱ्याचे मोठे योगदान आहे. येत्या काळात सर्वच संस्थामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करुया. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महाविद्यालयात सातत्याने नव्या सुविधा व अभ्यासक्रम समाविष्ट केले जात आहेत. विद्यार्थी केंद्रित प्रगती, गुणवत्ता, संशोधन यावर अधिक भर देऊ.

सौ. पूजा ऋतुराज पाटील यांनीही वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देत येत्या काळात तंत्रज्ञानावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले.

डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गुणवत्तेच्या बळावरच महाविद्यालयाला ‘नॅक’, ‘एनबीए’ मानांकन, तसेच युजीसीकडून स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

स्वागत आणि सूत्रसंचालन डॉ. लीतेश मालदे यानी केले. डॉ. संतोष चेडे आणि डॉ. अजित पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला. प्रा. आश्विन देसाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सीएचआरओ श्रीलेखा साटम, अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. अद्वैत राठोड, प्रा. डॉ. अजित पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. आश्विन देसाई, प्रा. रविंद्र बेन्नी, डॉ. महादेव नरके, डॉ. राजेश ख्यालाप्पा, डॉ. वैशाली गायकवाड, संजय जाधव, प्रा. अभिजित मठकर, डॉ. नवनीत सांगळे, प्रा. मकरंद काईगडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here