spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशिक्षणडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करत डॉ. पाटील यांच्याकडे ‘क्यूएस आय-गेज’ प्रमाणपत्र प्रदान केले.

कदमवाडी येथील डी वाय पाटील कॉलेज सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी बेंगळुरहून ‘क्यूएस आय-गेज’ चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज उपस्थित होते. विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सन्मानित केले.

रवीन नायर म्हणाले, डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन मिळवणे हे अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यापीठाची विविध पातळीवर असलेली गुणवत्ता सिद्ध होते. विद्यापीठाना बळकटी देण्यासाठी आमची एजन्सी काम करते. ‘क्यूएस आय-गेज’ संस्था विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या कॉलिटी एज्युकेशनचे परीक्षण करते व विविध निकषांवर मानांकन देते. या मानांकनामुळे जागतिक पातळीवर नवे यश संपादन करण्यासाठी विद्यापिठाच्या प्रयत्नांना गती मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू होतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगतीचे नव -नवीन टप्पे गाठले आहे. हे मानांकन विद्यापीठाला आणखी वेगाने प्रगती करण्याची प्रेरणा देईल. येत्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करू.

आय क्यू ए.सी. डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यांनी ‘क्यूएस आय-गेज’ मानांकन मिळण्यामागील प्रवास विषद करून या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 कार्यक्रमाला डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावकर, ॲड. रवी शिराळकर, सायबर कॉलेजचे डॉ. सर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. आर. बी. नेरली आदी उपस्थित होते. डॉ. मान्या मिध्धा व डॉ.ओमसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मानले.

——————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments