डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ पुरस्कार

0
171
Mumbai: Union Minister of State for Health Dr. Prithviraj Sanjay Patil receiving the 'Best Hospital with Medical College of the Year' award from Anupriya Patel.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

लाखो रुग्णांपर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आणि अत्याधुनिक उपचारांद्वारे आरोग्य सेवक उल्खलेनीय योगदान देणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८ व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कदमवाडी येथे २००३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या डी वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून गेल्या २२ वर्षापासून लाखो रुग्णांना निरंतरपणे किफायतशीर दरात आरोग्यसेवा पुरविली जात आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन केले जाते.

कोरोना महासंकटात डॉ. संजय डी. पाटील यांनी संपूर्ण रुग्णालय कोरोना सेवेसाठी समर्पित केले होते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा, तपासण्या व उपचार हॉस्पिटल च्या माध्यमातून गरजू पर्यंत पोहचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पीटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

हॉस्पीटलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्ट डॉ. शिंपा शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, सहाय्यक, सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

—————————————————————————————-

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here