पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी.टेक. ॲग्री) महाविद्यालयाच्या सानिका उत्तम खद्रे आणि अभिजित पंढरीनाथ गांगुर्डे या दोन माजी विद्यार्थ्याची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निवड झाली आहे. सानिका आणि अभिजित यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतं.
महाविद्यालयाच्या २०१९-२०२३ बॅचचा विद्यार्थी अभिजित पंढरीनाथ गांगुर्डे आणि २०२०-२०२४ बॅचची विद्यार्थिनी कु. सानिका उत्तम खद्रे यांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएट पदासाठी निवड झाली आहे. सानिका आणि अभिजित महाविद्यालयामध्ये आयोजित होणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असायचा.
या सत्कार सोहळ्यावेळी प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी “महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, त्यासाठी पूरक वातावरण, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यश मिळवत असून, हे आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतिक आहे. सानिका आणि अभिजित यांचे यश हे पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे”, असे प्रतिपादन केले तसेच
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिजित व सानिका यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



