अयातुल्ला अली खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेते असून, १९८९ पासून ते या पदावर आहेत. वय वर्षे ८६. ते इराणच्या सर्व सैन्यदलांचे, न्यायव्यवस्थेचे, सरकारचे आणि राज्य माध्यमांचे सर्वोच्च नियंत्रक आहेत. सध्या अमेरिकेविरुद्ध आणि इस्रायलविरुद्ध इराण जे युद्धात्मक निर्णय घेत आहे, त्यामागे मुख्यतः खामेनेई यांचेच नेतृत्व आहे.
अयातुल्ला अली खामेनेई यांची पार्श्वभूमी-
- जन्म : १९ एप्रिल १९३९, मशहद, धार्मिक ब्राह्मणिक कुटुंबात
- १९५८-६४ मध्ये कोम येथे धार्मिक शिक्षण घेतले
- शाहच्या राजवटीविरुद्ध सक्रिय, अनेक वेळा अटक झाली
- १९७९ च्या इस्लामिक क्रांतीचे महत्त्वाचे नेतृत्व
- १९८१-१९८९ या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष – इराण-इराक युद्ध काळात
- इमाम खोमेनींच्या निधनानंतर १९८९ मध्ये सर्वोच्च नेते झाले
सध्याच्या युद्धातील भूमिका –
- इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि कुद्स फोर्स यांच्याद्वारे ते इस्रायल व अमेरिकेविरुद्धची लढाई चालवतात
- कतार येथील अल उदेद इत्यादी लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ल्यांना मान्यता दिली
- IRGC च्या कमांडरच्या मृत्यूनंतर ते गुप्तस्थानी आहेत, पण इशारा दिला – “युद्धास युद्धाने उत्तर दिले जाईल”
कडक वैचारिकता व कट्टर धार्मिक राष्ट्रवाद : इस्लामिक मूल्यांचे पालन, अमेरिकन व पाश्चिमात्य विचारसरणी विरोधात कट्टर भूमिका
प्रसिद्धी आणि प्रभाव : स्वतःला इमाम अलीसारखे समजतात, स्वतःभोवती आदर्श व्यक्तिमत्वाची प्रतिमा तयार केली आहे
संस्कृतीप्रेमी पण पाश्चिमात्यविरोधी : ‘Les Misérables’ यांसारखी साहित्यकृती आवडतात, पण पश्चिमेला भौतिकतावादी मानतात
देशांतर्गत आंदोलन दडपणे : 1999 विद्यार्थी आंदोलन, 2009 ग्रीन मूव्हमेंट, 2022 महिला आंदोलने – सर्वांना अत्यंत कठोर दडपले
सुरक्षा दलांचा वापर वाढवला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित केले
उत्तराधिकारी आणि भावी घडामोडी : इस्रायली हल्ल्यांमुळे IRGC च्या वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला आहे, त्यामुळे धोरणात चुकांचा धोका
खामेनेई यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता उत्तराधिकारी शोधण्याचे काम सुरू
- पुत्र मोजतबा खामेनेई,
- धर्मगुरु सादिक लारीजानी,
- इमाम खोमेनींचे नातू हसन खोमेनी – यांची नावं चर्चेत
खामेनेई यांचे नेतृत्व धार्मिक कणखरतेने आणि स्वदेशाभिमानाने परिपूर्ण आहे. इस्रायल व अमेरिकेविरुद्धच्या युध्दात ते ठाम, युद्धप्रिय आणि निष्कलंक निर्णय घेणारे म्हणून ओळखले जात आहेत. मात्र त्यांच्या वयानुसार उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे, आणि इराणच्या भविष्यासाठी ही एक निर्णायक वेळ आहे.
डाॅ.राजेंद्र पारिजात, कोल्हापूर



