spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगअजरबैजानकडून पुन्हा कच्च्या तेलाची खरेदी

अजरबैजानकडून पुन्हा कच्च्या तेलाची खरेदी

ऊर्जा सामंजस्य करार व गुंतवणुकीला बळ

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताने रशियासह अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत असताना आता अजरबैजान कडून देखील तेल खरेदी पुन्हा सुरू केली आहे. दहा महिन्यांच्या तणावानंतर अजरबैजानने भारताला ऑगस्ट २०२४ मध्ये एकूण १,७४७.०७ टन कच्चे तेल निर्यात केले, ज्याची किंमत सुमारे ७,८१,५२० डॉलर होती, असे अजरबैजानच्या सीमा शुल्क डेटावरून स्पष्ट झाले आहे.

दोन्ही देशांमधील ऊर्जा सामंजस्य करार हा आर्थिक देवाण-घेवाणीचा महत्त्वाचा आधार मानला जातो. या करारामुळे भारत आणि अजरबैजान दरवर्षी पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीत स्थिरता राखू शकतात. २०२४ मध्ये भारत अजरबैजानकडून पेट्रोलियम व पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा जगातील चौथा सर्वात मोठा खरेदीदार ठरला. या वर्षी भारताने ११.७ लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली, ज्याची किंमत सुमारे ७२.९ कोटी डॉलर होती. याआधी  २०२२-२०२३ मध्ये भारत हा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार देश होता आणि त्या काळात तब्बल २० लाख टन कच्च्या तेलाची खरेदी करून १.६ अब्ज डॉलरची किंमत फेडली होती.

फक्त तेल खरेदीच नव्हे तर भारताने अजरबैजानमध्ये मोठी गुंतवणूक देखील केली आहे. बाकूमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, भारताच्या ओएनजीसीएलने अजरबैजानच्या अजेरीज चिराग-गुनाशाली तेल व गॅस प्रकल्पात तब्बल १.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक भारताला फक्त ऊर्जा पुरवठ्यात स्थिरता देते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा धोरणातही ताकद देते.
भारतासाठी ही घडामोड आणखी महत्त्वाची ठरते कारण अमेरिकेने दबावाचा उपाय म्हणून एच-1 बी व्हिसावर शुल्क वाढवले आहे. हे शुल्क जगात सर्वात महाग असून भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठा आर्थिक फटका ठरू शकतो. अशा परिस्थितीत भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संतुलन राखण्यासाठी विविध देशांकडून तेल खरेदी सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.

अजरबैजानकडून पुन्हा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू होणे भारताच्या ऊर्जा सुरक्षा धोरणासाठी व आर्थिक धोरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते. यामुळे देशाला पेट्रोलियम उत्पादक देशांशी संबंध मजबूत करण्याची संधी मिळाली आहे, तसेच जागतिक ऊर्जा बाजारातील चढउतारांवर प्रभावी नियंत्रण राखता येईल.

———————————————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments