पन्हाळा : प्रतिनिधी
टाळ-मृदंगाचा गजर,विठ्ठल नामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत आहे. आषाढी एकादशी रविवार दिनांक ६ जुलै रोजी होत असल्याने विठू माऊलीच्या दर्शनाला आतूर झालेल्या वारकऱ्यांची पावले आता पंढरपूर च्या दिशेने चालू लागली आहेत.
आषाढी एकादशी रविवार दिनांक ६ जुलै रोजी होत असल्याने विठू माऊलीच्या दर्शनाला आतूर झालेल्या वारकऱ्यांसह गावा गावातून दिंड्या टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूर च्या दिशेने चालू लागली आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनाला दररोज भाविकांची मोठी गर्दी होतं आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिनांक १९ जूनपासून आळंदीतून बाहेर पडला तो पालखी सोहळा पुण्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा फलटणवरून बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी तळावर विसावल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देऊ येथून १८ जूनला बाहेर पडला. पालखी सोहळा पुण्यातून इंदापूरच्या दिशेनेच्या दिशेने मार्गस्थ झाला.
निमगाव केतकी या गावात पालखी तळावर विसावल्यानंतर आलेल्या भाविकांनी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण पालखीतळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. तसेच या ठिकाणी वारकऱ्यांसाठी भव्य असा मंडपही उभारण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पंढरपूर येथील चंद्रभागात स्नान करून विठू माऊलीच्या शिखराचे दर्शन करत आहेत.
——————————————————————————————



