महाराष्ट्राचा प्रसिध्द राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव 2024 मधे वयाच्या 39व्या वर्षी निवृत्त झाला. निवृत्तीनंतर आता त्याची दुसरी इनिंग सुरु झाली असुन ती क्रिकेट मधे नाही तर राजकारणात असणार आहे. आणि त्याचा पक्ष असणार आहे तो भारतीय जनता पक्ष.
आता भाजपा मधे अनेक दिग्गज खेळाडू असून स्टार अभिनेत्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. तसे सर्वच राजकीय पक्ष खेळाडू व स्टार्सना आपल्या पक्षात आकर्षित करण्यासाठी धडपडत असतात. व आघाडीच्या राजकीय पक्षात खेळाडू दीसतात. राजकारणात विशेषतः निवडणूकांच्या काळात त्यांची लोकप्रियता सभांना गर्दी खेचण्यास उपयोगी पडते. तसेच अनेक खेळाडूंचाही सकारात्मक समाजकारण व राजकारण करण्याकडेही कल असतो.
राजकारणाला नवखे असणारे खेळाडू नंतर मातब्बर मुरब्बी राजकारणी बनतात. किर्ती आझाद, नवजोत सिंग सिद्धू, गौतम गंभीर हे आता चांगलेच राजकारणात मुरले आहेत. तर अनेक खात्यांचे केंद्रीय मंत्रीपद भुषवलेले ऑलिंपिक पटू व शूटींग मधिल रजतपदक विजेता राज्यवर्धन सिंग राठौर हे तर यात टाॅप ला आहेत. राज्यवर्धन सिंग राठौर (जन्म 29 जानेवारी 1970) हे भारतीय राजकारणी, नेमबाजीत ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारतीय सैन्यातील निवृत्त कर्नल आहेत. ते डिसेंबर 2023 पासून राजस्थान सरकारमधील उद्योग आणि वाणिज्य, युवा व्यवहार आणि क्रीडा खात्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत.
या शिवाय ऑलिंपिक बाॅक्सर विजेंदरसिह, गाजलेली नामांकित कुस्तीपटू बबीता फोगाट ज्यांनी हरयाना विधानसभेची निवडणूक भाजपा कडून लढवली होती, हाॅकीपटू संदीप सिंग, नेमबाज कर्नीसिंग असे दिग्गज खेळाडू भाजपच्या प्रभावळीत झळकत आहेत.
केदार जाधवने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत 101.60 च्या तगड्या स्ट्राईक रेटने 73 वनडे मधे 1389 धावा ठोकल्या त्याची सरासरी 42.09 अशी राहीली. यात दोन शतके, 6 अर्धशतके आहेत या शिवाय त्याने 27 विकेट्स ही घेतल्या.2013-14 चा क्रिकेट सिझन त्याचा सर्वोत्तम राहिला. चांगली कामगिरी करूनही कसोटी क्रिकेट साठी तीव्र स्पर्धा असल्याने सिलेक्शन होउ शकले नाही.