कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक मोठे अर्थकारण आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल क्रिकेट सामना हा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक उलाढाल घडवतो. सामन्याशी संबंधित अनेक क्षेत्रे, जसे की जाहिरात, प्रसारण हक्क, हॉटेल व्यवसाय, स्थानिक विक्रेते, वाहतूक सेवा, सुरक्षा यंत्रणा आणि तिकीट विक्री यावर मोठा परिणाम होतो. एक सामना रद्द झाला तर त्याचे परिणाम केवळ खेळाडूंवरच नव्हे तर हजारो लोकांच्या उत्पन्नावर होतात. विशेषतः आयपीएल सामन्यांमध्ये कंपन्यांनी कोट्यवधी रुपये प्रायोजकत्व, डिजिटल आणि टीव्ही जाहिरातीसाठी गुंतवलेले असतात. सामना रद्द झाल्यास हे पैसे वाया जाण्याची शक्यता असते.
क्रिकेट आता केवळ एक खेळ न राहता, एक “स्पोर्ट्स-एंटरटेनमेंट इव्हेंट” झाला आहे –
-
बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती : प्रमुख सामने, विशेषतः IPL, विश्वचषक (World Cup) सारख्या स्पर्धांमध्ये बॉलिवूड अभिनेते- अभिनेत्री हजेरी लावतात. त्यांची उपस्थिती चाहते आकृष्ट करते व टीव्ही रेटिंग्स वाढवते.
-
थेट संगीत कार्यक्रम व सादरीकरणे : उद्घाटन समारंभ, अंतिम सामना किंवा महत्त्वाच्या दिवशी लोकप्रिय गायक, नर्तक थेट सादरीकरण करतात. हे दर्शकांसाठी अतिरिक्त आकर्षण असते व सोशल मीडिया प्रमोशनसाठी उपयुक्त ठरते.
-
क्रिकेट + सिनेमा = ब्रँड वर्धन : सिनेमांचे प्रमोशन सामना दरम्यान केले जाते, तर खेळाडू चित्रपटांच्या प्रीमियरला हजेरी लावतात.
क्रिकेट एक प्रभावी व्यासपीठ आहे ब्रँडसाठी –
-
नवीन उत्पादनांची जाहिरात : कंपन्या क्रिकेट सामने प्रेक्षकांसमोर आपली उत्पादने सादर करतात. उदाहरणार्थ, नवा स्मार्टफोन, ड्रिंक, किंवा अॅप.
-
ब्रँड प्रमोशन : संघांच्या जर्सीवर, मैदानातल्या होर्डिंग्सवर, व खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर ब्रँड लावले जातात.
-
प्रायोजकता (Sponsorships) : IPL फ्रँचायझी, आंतरराष्ट्रीय संघ, मालिकांचे शीर्षक प्रायोजक ब्रँड्सना देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळते.
-
टीव्ही चॅनेल्स : सामना प्रक्षेपणासाठी चॅनेल्स कोट्यवधी रुपये खर्च करतात पण त्या बदल्यात त्यांना जाहिरातीतून जबरदस्त महसूल मिळतो.
-
डिजिटल स्ट्रीमिंग : JioCinema, Disney+ Hotstar, SonyLIV सारख्या अॅप्सवर सामने लाखो प्रेक्षक पाहतात. सबस्क्रिप्शन व जाहिरातींमधून उत्पन्न मिळते.
-
संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ : कॉमेंट्री, हायलाइट्स, फॅन अॅनालिसिस, सोशल मीडिया क्लिप्स या माध्यमांतून देखील आर्थिक लाभ घेतला जातो.
क्रिकेट सामन्यांमुळे आयोजक शहरांमध्ये प्रचंड आर्थिक घडामोडी होतात –
-
हॉटेल व्यवसाय : सामने बघायला आलेले पर्यटक स्थानिक हॉटेल्समध्ये राहतात, परिणामी बुकिंग्स वाढतात.
-
वाहतूक व गाइड्स : कॅब, बस सेवा, टूर गाइड्स, स्थानिक टूर कंपन्यांना व्यवसाय मिळतो.
-
स्थानिक विक्रेते : खाद्यपदार्थ विक्रेते, फॅन मर्चेंडाइज विक्रेते यांना फायदा होतो.
प्रत्येक क्रिकेट इव्हेंट मागे असते एक प्रचंड नियोजन यंत्रणा –
-
पोलीस यंत्रणा : जमाव नियंत्रण, VIP सुरक्षा, वाहतूक व्यवस्था यासाठी स्थानिक पोलिसांचा सहभाग आवश्यक असतो.
-
खाजगी सुरक्षा एजन्सीज : स्टेडियम, खेळाडूंचा प्रवास, हॉटेल्स यासाठी खाजगी सुरक्षा कंपन्यांची नेमणूक होते.
-
आपत्कालीन सेवा व आरोग्य व्यवस्था : अॅम्ब्युलन्स, डॉक्टर, अग्निशमन दल अशा सेवा स्टँडबाय ठेवाव्या लागतात.
-
व्यवस्थापन खर्च : सर्व नियोजनासाठी आयोजकांना मोठा खर्च करावा लागतो – जे स्पॉन्सर व तिकिट विक्रीतून वसूल केले जाते.
मात्र, जर हवामान वाईट असेल, नैसर्गिक आपत्ती अथवा इतर तांत्रिक कारणामुळे सामना रद्द झाला, तर संपूर्ण व्यवस्थापनाला फटका बसतो. प्रेक्षक नाराज होतात, आयोजकांना नुकसान होते, आणि आर्थिक उलाढाल थांबते. क्रिकेटचा एक सामना हा हजारो कुटुंबांच्या उत्पन्नाचे साधन असतो. त्यामुळे अशा घटना अर्थव्यवस्थेवरही अप्रत्यक्ष परिणाम घडवतात.
क्रिकेट सामना रद्द झाल्यास संभाव्य आर्थिक तोटा (भारत)
- प्रसारण हक्क व जाहिरात महसूल: स्टार स्पोर्ट्स व JioCinema सारख्या चॅनेल्सना प्रति सामना सुमारे ५०-७० कोटी रुपये उत्पन्न मिळते. सामना रद्द झाल्यास ह्या चॅनेल्सना २५-४० कोटी रुपयांपर्यंत तोटा होऊ शकतो. प्रायोजक कंपन्यांच्या जाहिरातींचे नुकसान: १०-१५ कोटी रुपये प्रति सामना.
- स्टेडियम तिकीट विक्री : मोठ्या सामन्यांतून (मुंबई, चेन्नई, कोलकाता) तिकीट विक्रीतून ५-१० कोटी रुपये उत्पन्न मिळते. सामना रद्द झाल्यास पूर्ण नुकसान.
- स्थानिक व्यवसाय : हॉटेल्स, प्रवास एजन्सी, स्थानिक विक्रेते, फूड स्टॉल्स यांना सरासरी १-२ कोटी रुपयांचा नुकसान. २०-२५ हजारांहून अधिक लघु व्यवसाय थेट प्रभावित होतात.
- आयोजक व सुरक्षा व्यवस्थापन : सुरक्षा, स्टाफ, आयोजनासाठी आधीच खर्च झालेला असतो — सुमारे २-५ कोटी रुपये. सामना न झाल्यास याचे परत मिळणं अशक्य.
- एकूण संभाव्य तोटा (प्रति सामना) : ७० ते १०० कोटी रुपये पर्यंत होऊ शकतो.
——————————————————————————————-






