कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आधार मिळतो आहे. या योजनांची माहिती अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचावी म्हणून शासनाने जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत या मंडळाची स्थापना करण्यात आली असून, कलम 18 (1) नुसार त्रिपक्षीय मंडळाची रचना राज्य शासनाने केली आहे. यामध्ये शासन, कामगार व मालकांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी असतात. मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असून, मंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांचा थेट लाभ देणे.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी व लाभदायक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कलम २२ नुसार मंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा :
-
अपघात किंवा मृत्यू झाल्यास तत्काळ आर्थिक सहाय्य
-
६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन
-
घर बांधण्यासाठी कर्ज अथवा आगाऊ रक्कम
-
गट विमा योजनेचे प्रीमियम भरपाई
-
मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य
-
गंभीर आजारांवरील उपचार खर्च
-
महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ
-
अन्य कल्याणकारी सुविधा व सुधारणांसाठी निधी
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ :
राज्य शासनाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करत कामगारांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची योजना देखील कार्यान्वित केली जात आहे. प्रत्येक कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक दिला जाईल आणि लाभांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
नोंदणीसाठी पात्रता निकष :
-
वय १८ ते ६० वर्षे दरम्यान
-
मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (फॉर्म-V सह):
-
आधार कार्ड
-
पत्ता पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल इत्यादी)
-
90 दिवस बांधकामाचे काम केले असल्याचे प्रमाणपत्र
-
पासपोर्ट साईज फोटो
-
बँक पासबुक झेरॉक्स
-
स्वघोषणापत्र
नोंदणीसाठी संकेतस्थळ : https://mahabocw.in
* प्रमुख योजना आणि त्यांचे फायदे –
* शैक्षणिक सहाय्यता योजना ————————————————————————
नोंदणीकृत कामगारांच्या मुला-मुलींना पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक सहाय्य दिलं जातं. शैक्षणिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा
-
पहिली ते चौथीपर्यंत ₹ १,०००
-
दहावी उत्तीर्ण झाल्यास ₹ ३,०००, बारावी उत्तीर्णसाठी ₹ ४,०००
-
आयटीआय, पदवी, डिप्लोमा, पदव्युत्तर शिक्षणासाठी ₹ ८,००० ते ₹ २५,००० पर्यंत शिष्यवृत्ती
-
गुणवत्ताधारित पारितोषिक योजना देखील कार्यान्वित
- नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना शाळा ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
* आरोग्य सहाय्यता योजना—————————————————————-
आरोग्य आणि अपघाती मदत योजनाही प्रभावी
-
उपचारासाठी ₹१ लाखापर्यंत आरोग्य सहाय्य
-
अपघाती मृत्यू – ₹५ लाख
-
नैसर्गिक मृत्यू – ₹२ लाख
-
अंत्यविधी सहाय्य – ₹१०,०००
-
अपघाती अपंगत्वासाठी ₹१ लाख पर्यंत मदत
-
गंभीर आजारांवर उपचारासाठी ₹1 लाखापर्यंत मदत
-
अपघाती दुखापतीसाठी ₹25,000
-
अपंगत्वासाठी ₹1 लाख
-
मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ₹5 लाख आर्थिक मदत
-
महिला कामगारांसाठी विशेष सुविधा ———————————————–
प्रसूती दरम्यान महिला कामगारांसाठी ₹१५,००० पर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. ही योजना त्यांच्या पतीच्या नोंदणीखालील महिलेलाही लागू होते.
* घरबांधणी अनुदान योजना———————————————————–
नोंदणीकृत कामगारांना स्वतःचं घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी ₹५०,००० पर्यंत अनुदान दिलं जातं. यासाठी किमान ३ वर्षांची नोंदणी आवश्यक आहे.
* कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना—————————————————–
-
बांधकाम क्षेत्रातील विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मोफत प्रशिक्षण-यात प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग, टाइल्स बसवणे, फिटर, शटरिंग, वॉटरप्रूफिंग इ. कामांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं.
-
प्रमाणपत्र दिले जाते, जे रोजगार संधींसाठी उपयुक्त
* सामूहिक विवाह योजना —————————————————————–
-
नोंदणीकृत कामगाराच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी ₹50,000 आर्थिक मदत-यामुळे अनेक गरजू कुटुंबीयांना दिलासा मिळतो आहे.
-
प्रमाणित कागदपत्रांच्या आधारे मिळते
नोंदणीची प्रक्रिया –
-
स्थानिक कामगार कार्यालयात जाऊन नोंदणी करता येते
-
कामगाराने कमीत कमी ९० दिवसांचे बांधकाम काम केलेले असावे
-
आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, कामाचा पुरावा आवश्यक
-
नोंदणी प्रक्रिया सुलभ – ‘महा BOCW’ संकेतस्थळावर उपलब्ध- नोंदणीसाठी कामगाराने किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेलं असणं आवश्यक आहे. सर्व योजना www.mahabocw.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्थानिक कार्यालयांमार्फत मदत दिली जाते.
संपर्क माहिती –
अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या –
www.mahabocw.in
किंवा स्थानिक बांधकाम कामगार कार्यालयात संपर्क करा.



