spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeविज्ञान - तंत्रज्ञानगुजरात मध्ये केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद

गुजरात मध्ये केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद

शिक्षण धोरण, नवकल्पना आणि २०४७ साठी तयारीवर भर

गुजरात : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय केंद्रीय विद्यापीठ कुलगुरू परिषदेचा शुभारंभ १० जुलै रोजी गुजरात मधील केवडियात होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मझुमदार तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होणार आहेत.

या परिषदेचा उद्देश केंद्रीय विद्यापीठांच्या प्रमुखांना एकत्र आणून संस्थात्मक प्रगतीचा आढावा घेणे, एकमेकांकडून शिकणे, तसेच २०४७ पर्यंतच्या शैक्षणिक उद्दिष्टांसाठी सामूहिक रणनीती आखणे असा आहे.
तीन मुख्य घटकांवर भर :
  • स्ट्रॅटेजिक अलायनमेंट (धोरणात्मक संरेखन) – विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या पुढील टप्प्याशी सुसंगत राहावे याची खात्री करणे.
  • पीअर लर्निंग आणि नॉलेज एक्सचेंज – नवकल्पनांना चालना देणे, सामायिक आव्हानांवर संवाद साधणे आणि संस्थात्मक सहकार्य वाढवणे.
  • फॉरवर्ड प्लॅनिंग आणि रेडीनेस – २०४७ च्या जागतिक शैक्षणिक स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठांना तयार करणे.
चर्चेतील दहा महत्त्वाचे विषय :
परिषदेच्या दरम्यान शिकवणे / शिकणे, संशोधन आणि प्रशासन या उच्च शिक्षणातील प्रमुख क्षेत्रांशी निगडित १० महत्त्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व सत्रे NEP 2020 च्या पिलर्स – समता, गुणवत्ता, प्रवेश, जबाबदारी आणि अफोर्डेबिलीटी  यांच्याशी सुसंगत असतील.
सत्रांमध्ये पुढील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे –
  • ४ वर्षांचा अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम आणि NHEQF/NCrF समजून घेणे व अंमलबजावणी.
  • भविष्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यासक्रमांचे समायोजन.
  • डिजिटल शिक्षण – SWAYAM, SWAYAM Plus, AAPAR क्रेडिट ट्रान्सफर यांवर भर.
  • युनिव्हर्सिटी गव्हर्नन्स – SAMARTH प्रणालीचा वापर.
  • समानतेचा पुरस्कार – समावेशी व समतामूलक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे.
  • भारतीय भाषा आणि ज्ञान प्रणाली – भारतीय भाषांमधून शिक्षण, भारतीय भाषा पुस्तक योजना.
  • संशोधन आणि नवकल्पना – ANRF, Centre of Excellence, PMRF सारख्या योजनांचा आढावा.
  • रँकिंग व मान्यता यंत्रणा – गुणवत्ता मूल्यांकनात पारदर्शकता व प्रगती.
  • इंटरनॅशनलायझेशन – भारतात परदेशी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी व आंतरराष्ट्रीय सहकार्य.
  • फॅकल्टी डेव्हलपमेंट – मालवीय मिशन अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम.
सहभागी विद्यापीठ –
या परिषदेत देशातील विविध प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी होणार आहेत. यामध्ये दिल्ली विद्यापीठ, JNU, अलाहाबाद विद्यापीठ, विश्वभारती, हरियाणा, राजस्थान, काश्मीर, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (IGNTU), हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ यांचा समावेश आहे.
ही परिषद NEP 2020 च्या अंमलबजावणीसाठी पुढील टप्पा निश्चित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. भारताच्या विकसित राष्ट्र २०४७ च्या दृष्टिकोनास पाठबळ देणाऱ्या या परिषदेचा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रावर दूरगामी परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.

——————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments