कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
आज महाराष्ट्र बेंदूर ! यानिमित्त बैलासह गाय, म्हैस, रेडा, वासर यांची शेतीकामात मदत होत असते म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैलपोळा अर्थात महाराष्ट्र बेंदूर हा सण विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त…
भारत एक कृषिप्रधान देश असून बैल हे शेतकऱ्याचे अत्यंत महत्त्वाचे साथीदार आहेत. पारंपारिक शेतीमध्ये बैलाला खूप महत्त्व होते. बैलाशिवाय कोणतेही काम होत नव्हते. म्हणूनच बैलाला शेतकऱ्याचा मित्र समजतात. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते. आजही बैलाचे महत्त्व तितकेच आहे.
शेतकरी बैलांसह गाय, म्हैस, रेडा, वासर यांना अंघोळ घालतात. शिंगांना तेल व रंग लावतात. गळ्यात घुंगरं, झुल व हार घातले जातात. डोक्यावर खास बाशिंगं (सुशोभित मुकुटासारखे) घातले जातात. बैलांसह गाय, म्हैस, रेडा, वासर यांना ओवाळले जाते. गुळ, अक्षता, हार, फुले अर्पण केली जातात.
गोडधोड भोजन दिले जाते. बैलांसह गाय, म्हैस, रेडा, वासर यांची सजवून गावातून मिरवणूक काढली जाते. मिरवणूकित लेझीम, ढोल, ब्यांडबाजा असतो. लहान मुले लाकडी बैल घेऊन त्यासोबत सहभागी होतात. घरात विशेष भोजन बनते – पुरणपोळी, भजी, श्रीखंड, वरणभात असे जेवण असते. हलगी, लेझीम, ढोल आदींचा वापर करून कार्यक्रम होतो.
बैलांच्या श्रमाबद्दल शेतकऱ्याकडून आभार व्यक्त करणारा हा दिवस. बैलपोळ्याच्या निमित्त पशुधनाची देखभाल, प्रेम, आदर आणि संरक्षण याबद्दल जागृती केली जाते. या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन सण साजरा करतो. परंपरा आणि संस्कृती जपण्याचा एक महत्त्वाचा सण.बेंदूर किंवा पोळा हा सण केवळ एक धार्मिक परंपरा नसून, तो शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व अधोरेखित करणारा, प्रेम, सेवा, आणि सजीवांशी असलेल्या नात्याची जाणीव करून देणारा सण आहे.
——————————————————————————————



