कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शरीराला थंडावा देणारे, थकवा दूर करणारे फळ शहाळे होय. याला नारळपाणी असेही म्हणतात. शहाळे (Coconut Water) ही नारळाच्या कोवळ्या फळात असलेली पारदर्शक, गोडसर, पौष्टिक आणि थंडावा देणारी द्रव स्थिती असते. हे एक आरोग्यदायी आणि नैसर्गिक पेय मानले जाते. शहाळेमध्ये ९४ टक्के पाणी असते. म्हणूनच हे फळ जरी वर्षभर बाजारात उपलब्ध असले तरी आणि फक्त रुग्णासाठी हे फळ दिले जात असले तरी याची मागणी उन्हाळ्यात वाढते.
शहाळ्याचे उगमस्थान इंडो-मलायन प्रदेश आहे; पण आता शहाळे उष्णकटिबंधीय भागात सर्वत्र पसरलेले आहे. याची वाढ समुद्रकिनाऱ्यालगत, वालुकामय किंवा चिकणमातीतील सुपीक जमिनीत चांगली होते.
शहाळ्यातील पोषक घटक : पाणी – ९४ टक्के, साखर – ग्लूकोज, फ्रुक्टोज. खनिजे – पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस. विटॅमिन्स – व्हिटॅमिन सी, थोडी बी-कॉम्प्लेक्स. अमिनो अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि एंजाइम्स.
आरोग्यदायी फायदे : उत्तम हायड्रेशन – उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखते. इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत – थकवा, उष्माघात यावर उपयुक्त. पचनासाठी उपयोगी – गॅस, अपचन, मळमळ यावर उपाय. किडनीसाठी फायदेशीर – लघवी साफ ठेवते, किडनी स्टोन कमी करण्यास मदत. वजन कमी करण्यासाठी उपयोगी –या फळात कमी कॅलरी असते, भूक दडपते. त्वचा व केसांसाठी उपयोगी – केसांची वाढ सुधारते, त्वचेला पोषण मिळते.
दक्षता : मधुमेहींनी प्रमाणात घ्यावे, कारण शहाळ्यात नैसर्गिक साखर असते. फ्रिजमध्ये फार दिवस ठेवू नये, ताजं शहाळं पिणं उत्तम. जास्त शहाळं घेतल्यास थंडी/सर्दी होऊ शकते – थोड्याच प्रमाणात नियमित घ्यावे.
भारत, श्रीलंका, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या देशांत शहाळ्याला मोठी मागणी आहे. नारळाची झाडे ६-७ वर्षांत फळधारणा करतात. एक झाड दरवर्षी सुमारे ७०-१०० शहाळे देऊ शकते. शहाळ्याची विक्री ही फायदेशीर व्यवसाय संधी आहे.
…………………………………………………………………………………………………………



